
no images were found
ताजमहालला आग्रा महानगरपालिकेची सुमारे एक कोटी रुपये भरण्याची नोटीस
जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल सध्या कर थकबाकीच्या वादात अडकला आहे. 15 दिवसांत कर भरला नाही तर ताजमहालावर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. पाणी आणि मालमत्ता कराची तब्बल 1 कोटी 40 लाखांची थकबाकी असून ही थकबाकी २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षाची आहे.
15 दिवसांत थकीत कर जमा केला नाही तर ताज महाल जप्त केला जाईल असे नोटिशीमध्ये नमूद आहे. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिका-यांनी थकबाकीबाबत हात वर केल्याचे समजते. स्मारकांना मालमत्ता कर लागू होत नाही तसेच ताजमहालचा कोणताही व्यावसायिक वापर नसल्यामुळे पाण्यावरील कर भरण्यास पुरातत्व सर्वेक्षण जबाबदार नाही असे त्यांनी म्हटले आहे. ताजमहालला सुमारे एक कोटी रुपये भरण्याची नोटीस आग्रा महानगरपालिकेने बजावली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला नोटीस बजावून त्यांना दीड लाख रुपयांचा मालमत्ता कर भरण्यास सांगितले आहे. १५ दिवसांत थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तर ऐतिहासिक वास्तूंवर मालमत्ता कर लागू होत नसल्याचे एएसआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट करत पाण्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत नसल्याने पाण्याची टाकी बंद करण्याचा नियम नाही. ताजमहालच्या सभोवतालची हिरवळ टिकवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. अशा प्रकारची ही पहिलीच नोटीस आहे, असे सांगण्यात आले आहे. आग्रा महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ताजमहालचा समावेश असलेल्या क्षेत्रातील कर अटी निश्चित करण्यासाठी एका खासगी कंपनीला नियुक्त केले गेले आहे आणि त्यांनी नोटीस पाठवली असावी.