no images were found
भिवंडीत तरुणाची गोळ्या झाडून हत्या
ठाणे : ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ठाण्यात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण या तरुणाची प्राणज्योत अखेर मालवली. हत्या झालेल्या मृत तरुणाचे नाव गणेश कोकाटे (वय ३३) असून याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यामधील लोढा तेथे काम पुरवण्याच्या कामावरुन गणेश कोकाटे आणि गणेश इंदुलकर यांच्यात वाद सुरु होता. या वादामधून यापूर्वी गणेश कोकाटे याचेवर गणेश इंदुलकर याने गोळीबार केला त्यासंदर्भात चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौघांना अटक झालेली होती.
परंतु गणेश इंदुलकर हा फरार होता. दरम्यान बुधवारी सायंकाळी गणेश कोकाटे ठाणे येथून कशेळी येथील त्याच्या घरी जात असताना त्याच्यावर वाटेत हा हल्ला झाला. दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने गणेश कोकाटे याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तो फरार झाला. या गोळीबारामध्ये गणेश कोकाटे हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी गणेश कोकाटेला ताबडतोब ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. या हत्याकांड प्रकरणी नारपोलीस पोलीस ठाणे, भिवंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. गणेश कोकाटेच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी एकूण ३ पथके तैनात करण्यात आली असून लवकरच फरार आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.