राज्यपालांच्या हस्ते अनुपम खेर यांना डीएव्ही रत्न पुरस्कार प्रदान मुंबई : – शिमला येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते डीएव्ही रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते डीएव्ही व्यवस्थापन समितीतर्फे संस्थेच्या प्रथितयश माजी विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. राज्यपालांनी यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विविध …