साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल कुलगुरूंकडून कृष्णात खोत यांचा गौरव कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून आणि कोल्हापूरचे सुपुत्र म्हणून आपणास मिळालेल्या यशाचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांचा गौरव केला. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काल (दि. २) सायंकाळी श्री. खोत यांच्या फुलेवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे ग्रंथभेट आणि अभिनंदनाचे पत्र …