Home Uncategorized सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

1 second read
0
0
5

no images were found

सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

कोल्हापूर,: भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर, सर्व उपस्थितांनी एकता व सद्भावना यांची शपथ घेतली. डॉ. प्रमोद कसबे यांनी शपथ प्रदान केली.

यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. अजितसिंह जाधव, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. किरण कुमार शर्मा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे समन्वयक डॉ. तुकाराम डोंगळे, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. संतोष सुतार, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुर्यबाला सावंत, डॉ. देवश्री पाटील, डॉ. सोमनाथ पवार, डॉ. स्नेहा पाटील, डॉ. योजना पाटील, डॉ. तेजस्विनी भट यांच्यासह विविध अधिविभागांचे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

“एकमेकांच्या ताकदी समजून घेणे, वेगवेगळ्या मतांचा आदर करणे आणि समान ध्येयासाठी एकत्रितपणे काम करणे म्हणजेच सांघिक भावना,”: मनीष वाधवा 

“एकमेकांच्या ताकदी समजून घेणे, वेगवेगळ्या मतांचा आदर करणे आणि समान ध्येयासाठी एकत्रितपणे क…