Home Uncategorized बाजारगेट, पाईनलाईन, परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

बाजारगेट, पाईनलाईन, परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

7 second read
0
0
7

no images were found

बाजारगेट, पाईनलाईन, परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

कोल्हापूर : शहरातील बाजार गेट, पानलाईन, कसबा बावडा, लिशा हॉटेल रोड या परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक व उपद्रव शोध पथकाने अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली. बाजार गेट, पानलाईन येथील दुकानाबाहेर आलेले 45 शेड हटविण्यात आले तर 3 टेबल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच कसबा बावडा, लिशा हॉटेल मेन रोड परिसरातील विनापरवाना घातलेले 3 मंडप व 1 फटाके स्टॉलवर कारवाई करण्यात आली.

            शहरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित व्यावसायिकांना परत दिले जाणार नसून ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रफुल्ल कांबळे यांच्यासह अतिक्रमण, उपद्रव शोध पथकाचे जवान व अग्निशमन जवानांनी ही कारवाई केली.

तरी शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक, रस्त्यांवर उभारलेले अनधिकृत शेड्स, मंडप, फटाके स्टॉल आणि इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. संबंधितांनी आपापली अतिक्रमणे तातडीने स्वतःहून हटवावीत. अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नाही असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !

‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोट…