Home Uncategorized पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन-

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन-

2 second read
0
0
9

no images were found

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली

कोल्हापूर(प्रतिनिधी):-शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दासाहेब) यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे प्रतिमापूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ येथे झालेल्या कार्यक्रमात कुलपती तथा ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, साळोखेनगरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजित माने, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी डॉ. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदेच्यावतीने डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ येथे डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली. कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डॉ. एस. आर. पावसकर, प्रा. डी. एन. शेलार यांच्यासह सर्व संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन पंचांग 2027’ मराठी ॲपचे लोकार्पण !

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभ…