Home Uncategorized सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर 10 दिवसांत 156 जणांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर 10 दिवसांत 156 जणांवर कारवाई

23 second read
0
0
5

no images were found

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर 10 दिवसांत 156 जणांवर कारवाई: 2 लाख 60 हजार 500 रुपयांचा दंड वसूल

कोल्हापूर, : शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने प्लास्टिकचा वापर करणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, उघड्यावर लघुशंका करणारे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे, रस्त्यावर खरमाती टाकणारे तसेच उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक व आस्थापनांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत दि.12 ते 21 ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 156 व्यक्तींवर कारवाई करून 2 लाख 60 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

            महापालिकेच्या कारवाईमध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्या 71 नागरिक व व्यावसायिकांकडून  75 हजार 900 रुपये, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या 66 नागरिकांकडून 1 लाख 71 हजार 4०० रुपये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, लघुशंका व थुंकणाऱ्या 15 व्यक्तींकडून 6 हजार 2०० रुपये, तर अतिक्रमण करणाऱ्या 4 व्यक्तींकडून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

            शहरातील स्वच्छता अबाधित राहावी, सार्वजनिक ठिकाणी होणारे उपद्रव रोखले जावेत तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.

            महापालिकेच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीकडेच द्यावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे, रस्त्यावर अथवा नाल्यात कचरा टाकणे तसेच प्लास्टिक वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणे आढळून आल्यास लागू नियम व संबंधित कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन पंचांग 2027’ मराठी ॲपचे लोकार्पण !

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभ…