Home सामाजिक जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन पंचांग 2027’ मराठी ॲपचे लोकार्पण !

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन पंचांग 2027’ मराठी ॲपचे लोकार्पण !

15 second read
0
0
8

no images were found

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन पंचांग 2027’ मराठी ॲपचे लोकार्पण !

श्री क्षेत्र नाणीज येथे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर दिनांक २० ऑक्टोबर २०२६ या दिवशी ‘सनातन पंचांग २०२७’ या मराठी ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या मंगल प्रसंगी स्वामीजी आशीर्वाद देतांना म्हणाले, ‘‘हे अतिशय सुंदर प्रकारचे पंचांग ॲप आहे. ‘सनातन पंचांग’ खूप चांगले असून अतिशय उपयुक्त आहे. अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा’, असे आवाहनही केले. स्वामीजींनी ‘सनातन पंचांग’ सात भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे आवर्जून सांगत त्यांनी स्वतःच्या भ्रमणभाषवर हो ॲप लगेचच डाऊनलोडही करून घेतले. या वेळी स्‍वामीजींच्या हस्ते शुभदिनी या ॲपचे लोकार्पण झाले, याबद्दल ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या ‍वेळी ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने श्री. गोविंद भारद्वाज, सौ. दीपा औंधकर, सौ. शुभांगी मुळ्ये आणि श्री. हनुमंत करंबेळकर हे उपस्थित होते.

‘सनातन पंचांग’ हे ॲप Android आणि iOS या दोन्ही प्रणालींवर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि तमिळ अशा ७ भाषांमध्ये उपलब्ध आहे. Android प्रणालीवरील ‘सनातन पंचांग’ ॲप 41 लाखांहून अधिक, तर iOS प्रणालीवरील ॲप 7 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. आपण स्वतः, आपल्या नातेवाइकांना, मित्रपरिवाराला, शेजार्‍यांना आणि कार्यालयीन सहकार्‍यांना हे ॲप डाउनलोड करण्यास सांगून भारतीय संस्कृतीचा प्रसार करावा, असे आवाहन ‘सनातन पंचांग’च्या वतीने करण्यात येत आहे.

‘सनातन पंचांग ॲप’ मधून शुभमुहूर्त, सण-उत्सव, धर्मशिक्षण, आरोग्य विषयक टिप्स, सुविचार आदी दैनंदिन जीवनासाठी आवश्यक माहिती देण्यात येते. संकष्टी चतुर्थी, एकादशी यांसारख्या महत्त्वाच्या तिथींच्या पूर्वसूचना, दिनविशेष, होमस्क्रीन विजेट, रिमाइंडर अशा अनेक सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहे.

*‘सनातन पंचांग’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक – Sanatanpanchang.com/download-apps/*

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन-

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीर…