Home गौरव सन्मान डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान -आय ट्रिपल ई कॉन्क्लेव्हमध्ये देदीप्यमान कामगिरी

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान -आय ट्रिपल ई कॉन्क्लेव्हमध्ये देदीप्यमान कामगिरी

2 second read
0
0
8

no images were found

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान -आय ट्रिपल ई कॉन्क्लेव्हमध्ये देदीप्यमान कामगिरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बंगळुरू येथे झालेल्या इंस्टीटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय-ट्रिपल-ई) कॉन्क्लेव्हमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यानी टॉप २५ अॅम्बेसेडरमध्ये स्थान मिळवले.

बंगळुरू येथील क्राइस्ट युनिव्हर्सिटी येथे आयोजित या कॉन्क्लेव्हमध्ये महाविद्यालयाच्या ३० विद्यार्थी आणि ४ प्राध्यापकांनी सहभाग घेतला.यामध्ये आयोजित ऑल इंडिया स्टुडंट, यंग प्रोफेशनल, वुमन इन इंजिनिअरिंग आणि लाइफ मेंबर्स काँग्रेस (एआयएसवायडब्ल्यूएलसी–२०२६) मध्ये देशभरातील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या श्रेयश माने याने द्वितीय क्रमांक, तर आशुतोष इंगळे याने २४ वा क्रमांक मिळवत टॉप २५ मध्ये स्थान पटकावले. विद्यार्थ्यांचा आय ट्रिपल ईच्या विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग, नेतृत्वगुण आणि स्टुडंट ब्रँचच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल या कामगिरीतून घेण्यात आली.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटची स्टुडंट ब्रँच तुलनेने नव्याने स्थापन झालेली असून, अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील आय ट्रिपल ईच्या व्यासपीठावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील आणि आय ट्रिपल ई स्टुडंट ब्रँचचे प्रमुख डॉ. ग्रंतेज ओतारी, समन्वयक प्रा. सतीश रणभिसे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. डॉ. शीतल दिंडे, डॉ. निलम जाधव आणि प्रा. अमृत काजवे यांनी मेंटॉर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्टुडंट ब्रँचच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.  

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.      …