Home Uncategorized ₹ ६ लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या रूपरेषेसह महाराष्ट्राच्या विकासासाठी अदाणी  समूहाची बांधिलकी

₹ ६ लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या रूपरेषेसह महाराष्ट्राच्या विकासासाठी अदाणी  समूहाची बांधिलकी

10 second read
0
0
7

no images were found

₹ ६ लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या रूपरेषेसह महाराष्ट्राच्या विकासासाठी अदाणी  समूहाची बांधिलकी

मुंबई, : अदाणी  समूहाने महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आपल्या दीर्घकालीन बांधिलकीचा पुनरुच्चार केला असून, महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये ₹६ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीची रूपरेषा मांडली आहे. ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या गुंतवणूक प्रोत्साहन उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ही घोषणा करण्यात आली. गुंतवणुकीच्या संधी आणि गुंतवणूकदारांचा कल प्रत्यक्ष प्रकल्पांच्या अंमलबजावणीत रूपांतरित करण्याच्या उद्देशाने हा संस्थात्मक गुंतवणूक प्रोत्साहन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना श्री.प्रणव अदाणी , मॅनेजिंग डायरेक्टर (अॅग्रो, ऑइल  अँड गॅस) आणि डायरेक्टर, अदाणी  एंटरप्रायझेस यांनी सांगितले की,भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राला राष्ट्रीय विकासाचे प्रमुख इंजिन संबोधताना त्यांनी मुंबईचे देशाचे आर्थिक केंद्र म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित केले. तसेच व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आणि सर्वसमावेशक, लोककेंद्रित विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

श्री. अदाणी  यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला. विशेषतः पायाभूत सुविधांचा विकास, मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी आणि वॉर रूम मॉडेल तसेच ईज ऑफ डुइंग बिझनेस सुधारणांसारख्या उपक्रमांबद्दल त्यांनी प्रशंसा केली. तसेच उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाचा आणि पर्यावरण संवर्धन व ग्रामीण सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचाही उल्लेख केला. २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन अमेरिकी डॉलरची करण्याचे उद्दिष्ट, ज्यामध्ये मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) मध्यवर्ती भूमिका असेल, यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अदाणी  समूहाच्या गुंतवणुकीच्या रूपरेषेत ऊर्जा, विमान वाहतूक आणि एअरो–डिस्ट्रिक्ट्स, शहरी पुनर्विकास, डेटा सेंटर आणि कोळसा गॅसिफिकेशन या क्षेत्रांचा समावेश आहे. सुमारे ₹२.६ लाख कोटी मूल्याचे प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाले आहेत किंवा त्यांची अंमलबजावणी सुरू आहे, ज्यातून महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासातील समूहाचा सातत्यपूर्ण सहभाग दिसून येतो.

विमान वाहतूक क्षेत्रावर प्रकाश टाकताना श्री. अदाणी  यांनी सांगितले की, समूहाकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (CSMIA) व्यवस्थापन आणि परिवर्तन केले जात असून ग्रीनफिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास केला जात आहे. या विमानतळावर भविष्यात दरवर्षी ९ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक हाताळण्याची अपेक्षा आहे. दोन्ही विमान वाहतूक केंद्रांभोवती एकात्मिक विमानतळ व्यवसाय आणि हॉस्पिटॅलिटी जिल्हे विकसित केले जात असून, त्याद्वारे कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ऊर्जा क्षेत्रात अदाणी  इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) मुंबईतील ३० लाखांहून अधिक घरे आणि आस्थापनांना वीजपुरवठा करते. या वीजपुरवठ्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक वीज नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमधून मिळते. मुंबईची वीजपुरवठा क्षमता आणि स्थैर्य मजबूत करण्यासाठी समूहाने १,००० मेगावॅट क्षमतेची हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट (HVDC) ट्रान्समिशन लिंक उभारली आहे. यासोबतच चोवीस तास हरित ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात पंप्ड-स्टोरेज हायड्रो उपक्रमही राबवले जात आहेत.

श्री. अदाणी  यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरही प्रकाश टाकला. या प्रकल्पामध्ये सन्मानजनक घरे, आधुनिक पायाभूत सुविधा, स्थानिक उपजीविकेचे संरक्षण आणि सूक्ष्म उद्योगांचे औपचारिकीकरण यावर भर देण्यात आला आहे. हा उपक्रम ‘मुंबई ३.०’ या व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून अधिक चांगली कनेक्टिव्हिटी असलेला, संतुलित आणि सर्वसमावेशक महानगर प्रदेश निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करताना श्री. अदाणी  यांनी सांगितले की,‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभामुळे गुंतवणूकदारांचा कल सातत्यपूर्ण प्रत्यक्ष अंमलबजावणीत रूपांतरित करण्यास मदत होईल. औद्योगिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास आणि सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी अदाणी  समूह महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील जनतेसोबत काम करत राहील, असे त्यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शाश्वत अभियांत्रिकीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवा : कुणाल जगदाळे

शाश्वत अभियांत्रिकीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवा : कुणाल जगदाळे – डी. वाय. पाट…