Home आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ३० सप्टेंबरला विशेष आरोग्य तपासणी शिबिर

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ३० सप्टेंबरला विशेष आरोग्य तपासणी शिबिर

32 second read
0
0
5

no images were found

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ३० सप्टेंबरला विशेष आरोग्य तपासणी शिबिर

‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले रुग्णालयात आयोजन; विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन

 कोल्हापूर, : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेतील सर्व सफाई कर्मचारी व सफाई मित्रांसाठी विशेष आरोग्य तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात होणार आहे.

            स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित व निरोगी राहणे ही स्वच्छ आणि निरोगी शहराच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी, आजारांचे वेळेत निदान, आवश्यक उपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ व ऑर्थोपेडिक सर्जन, जनरल सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ (ईएनटी) तसेच अन्य आवश्यक वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

            तसेच शिबिरामध्ये ईसीजी तपासणी, संशयित क्षयरुग्णांसाठी एक्स-रे तपासणी तसेच रक्त व लघवीच्या ३४ प्रकारच्या विविध तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय तपासणी व उपचाराबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

            आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा संरक्षणासाठी ‘गोल्डन कार्ड’ उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांना देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

            तरी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व सफाई कर्मचारी, सफाईमित्र तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे उपस्थित राहून या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा कोल्हापूर, : या ठि…