Home सामाजिक महात्मा ज्योतिबा फुलेंना स्मृतिदिनी अभिवादन!

महात्मा ज्योतिबा फुलेंना स्मृतिदिनी अभिवादन!

1 second read
0
0
260

no images were found

महात्मा ज्योतिबा फुलेंना स्मृतिदिनी अभिवादन!

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (28 नोव्हेंबर 1890) पुण्यतिथी! सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज संस्थेद्वारे समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज सर्वांनी आदरांजली वाहिली आहे.

ज्योतिबांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर काम केले. जनतेने त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी 1888मध्ये बहाल केली. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी 1848मध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतीबा आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिबांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…