Home सामाजिक ‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

13 second read
0
0
17

no images were found

नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, : युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. उत्साहाने भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’  या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईतील वरळी येथील राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी’ उत्सव प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, आमदार अमित साटम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

निरोगी आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, तसेच आपल्या कुटुंबात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

दहीहंडी हा महाराष्ट्राच्या परंपरेचा, साहसाचा आणि संघभावनेचा जागर

      दहीहंडी हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या परंपरेचा, तरुणाईच्या साहसाचा आणि संघभावनेचा जागर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकात आमदार राम कदम यांच्या वतीने आयोजित मानाच्या दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. गोविंदा पथकांतील तरुणांचा उत्साह, जिद्द आणि शिस्त पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.

     मुख्यमंत्री म्हणाले की, दहीहंडीतील मानवी मनोरे हे संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. तळातील गोविंदांच्या मजबूत आधारापासून ते सर्वांत वरच्या थरावर पोहोचणाऱ्या बालगोविंदापर्यंत प्रत्येकाचा समन्वय, विश्वास आणि धैर्य या खेळाला यशस्वी करतात. घाटकोपरची दहीहंडी ही मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनली असून, येथे देशाच्या विविध भागांतून येणारी पथके सहभागी होतात. त्यामुळे हा उत्सव आता केवळ स्थानिक स्वरूपाचा न राहता व्यापक ओळख निर्माण करणारा सांस्कृतिक सोहळा झाला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेध…