Home सामाजिक सावकारांच्या पाशात अडकलेल्या नागरिकांनी तात्काळ तक्रार करावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

सावकारांच्या पाशात अडकलेल्या नागरिकांनी तात्काळ तक्रार करावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

8 second read
0
0
7

no images were found

सावकारांच्या पाशात अडकलेल्या नागरिकांनी तात्काळ तक्रार करावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 कोल्हापूर, : जिल्ह्यात अवैध सावकारीच्या अनुषंगाने सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी करुन अवैध सावकारांच्यावर त्वरीत कार्यवाही करुन सावकारांच्या पाशात अडकलेल्या अगर सावकारांकडून पिळवणूक होत असलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याबाबत आवश्यक ती मदत करण्यात येईल तसेच अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या नागरिकांनी समितीकडे मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

     अनधिकृत सावकारी व्यवसाय करणा-या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्देशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत जिल्हास्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून जिल्हा पोलीस प्रमुख हे सदस्य आहेत तर सदस्य सचिव हे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे आहेत.

      जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अवैध सावकारीच्या अनुषंगाने आर्थिक पिळवणूक अगर अवैध सावकारीच्या ओघात स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकावली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर (संपर्क क्रमांक ०२३1-२६५६२५८) कार्यालयात तात्काळ संपर्क साधावा अगर ddrkolhapur@gmail.com या ईमेलवर तक्रार अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध

‘अडकित्ता‘ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश…