Home सामाजिक एलपीजी (LPG) उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढला, शासनाच्या प्रयत्नांना यश

एलपीजी (LPG) उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढला, शासनाच्या प्रयत्नांना यश

2 second read
0
0
23

no images were found

एलपीजी (LPG) उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढला, शासनाच्या प्रयत्नांना यश

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे (MoPNG), ग्राहक संरक्षण, कामामधील पारदर्शकता आणि सुरळीत कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एमओपीएनजी सुनियोजित कामाद्वारे स्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनाची पुरवठा साखळी अधिक बळकट करत आहे. इंधनाचा साठा करुन ठेवणे आणि काळाबाजार यांसारख्या गैरप्रकारांविरुद्ध देशव्यापी मोहिमेद्वारे कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण देशभरात एलपीजीचा सातत्यपूर्ण आणि विनाअडथळा पुरवठा सुरळीत व्हावा याकडे अधिक भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि वितरण व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवल्यामुळे जबाबदारी आणि सेवा वितरणात सुधारणा होत आहे. याद्वारे कार्यप्रणालीवर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे.

स्वच्छ इंधन सर्वांना कायमस्वरूपी उपलब्ध व्हावे यासाठी शासन आता पाईपलाईनद्वारे मिळणाऱ्या गॅसच्या (PNG) सोयीसुविधा वाढवण्यावर भर देत आहे. गॅसचा पुरवठा नियमित आणि कारभार पारदर्शक झाल्यामुळे ग्राहकांचा दृष्टिकोन बदलला आहे. ग्राहकांमध्ये पुरवठा आणि सेवेच्या विश्वासार्हतेबद्दल अधिक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ग्राहकांचा विचार करणारी आणि काळाप्रमाणे बदलणारी स्वच्छ इंधन यंत्रणा उभी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे या प्रयत्नांमधून दिसून येते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…