Home Uncategorized शिवाजी विद्यापीठात ‘राधा’ अभिवाचनास रसिकांचा उदंड प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात ‘राधा’ अभिवाचनास रसिकांचा उदंड प्रतिसाद

0 second read
0
0
34

no images were found

शिवाजी विद्यापीठात ‘राधा’ अभिवाचनास रसिकांचा उदंड प्रतिसाद : अभिवाचनातून उलगडला राधा-कृष्णाच्या नात्याचा भावस्पर्शी प्रवास
शिवाजी विद्यापीठातील कल्चरल क्लब अंतर्गत संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि ‘स्वरमयी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राधा’ कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमाला रसिकांचा, प्राध्यापकांचा व विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.
‘कृष्णकिनारा’ या अरुणा ढेरे यांच्या संवेदनशील कथासंग्रहातील ‘राधा’ ही कथा नात्यांच्या गूढतेवर आणि स्त्रीच्या अंतरंग भावनांवर प्रकाश टाकणारी काळजाला भिडणारी कथा आहे. या कथेतून स्त्रीचं प्रेम, तिची तडफड आणि त्याग यांचं प्रखर चित्रण दिसून येतं. सविता कबनूरकर यांची निर्मिती व संकल्पना असलेल्या या अभिवाचनाचे उत्कृष्ट दिग्दर्शन डॉ. शरद भुताडिया यांनी केले होते. अभिवाचक प्रसिद्ध नाट्य अभिनेते राजन जोशी, संगीतकार उमेश नेरकर आणि गायिका सविता कबनूरकर यांनी आपल्या सहज, प्रभावी आणि नाट्यमय अभिवाचनातून कथेतील प्रत्येक प्रसंग आणि पात्रांच्या भावना जिवंत केल्या. उमेश नेरकर यांच्या पार्श्वसंगीताने आणि शुभम चौगुले यांच्या संगीत संचालनाने अभिवाचनातील भावउत्कटता अधिकच वाढवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी कला आणि साहित्याचा हा सुरेल संगम विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक अभिरुचीला समृद्ध करणारा आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मीरा गर्गे या विद्यार्थिनीने केले. ध्वनिव्यवस्था श्री. मल्हार जोशी तर नेपथ्य विकास कांबळे यांनी पाहिले.
या प्रसंगी विद्यापीठातील विविध अधिविभागांचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि कलाप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…