Home शैक्षणिक महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे महानगरपालिकेची मान उंचावली : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड

महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे महानगरपालिकेची मान उंचावली : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड

1 min read
0
0
6

no images were found

महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे महानगरपालिकेची मान उंचावली : आयुक्त डॉराजेंद्र भारूड

कोल्हापूर, : विद्यार्थ्यांच्या यशाला शिक्षकांच्या कर्तृत्वाची साथ मिळाली की महानगरपालिकेच्या शाळांची मान निश्चितच उंचावतेगुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असूनत्यांच्या यशातून महापालिका शाळांची गुणवत्ता अधोरेखित होत आहे असे प्रतिपादन आयुक्त डॉराजेंद्र भारूड यांनी केले.

            महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयशाळा क्रमांक ३३ येथे इयत्ता चौथीपाचवी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या यशासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचा ‘कौतुक सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला होतायावेळी आयुक्त डॉराजेंद्र भारूड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आलीढोलताशेलेझीम व हलगीच्या निनादात विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा जल्लोष केलासुशील जाधव यांनी लेझीम पथकाची विशेष तयारी करून घेतली.

            यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आलाइयत्ता सातवीचे प्रभाकर लोखंडेसौमनिषा पांचाळ व सौनिता खाडेइयत्ता पाचवीच्या सौसुजाता फराकटेसौराणी शेलार व सुनील परीटतसेच इयत्ता चौथीच्या सौप्रतिभा चौगुले व सौसुरेखा पाटील यांचा गौरव करण्यात आलाशिष्यवृत्ती विभाग प्रमुख संजय शिंदे व शाळेचे केंद्र मुख्याध्यापक विलास पिंगळे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

            तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल इयत्ता चौथीतील १३इयत्ता पाचवीतील ११ आणि इयत्ता सातवीतील ९अशा एकूण ३३ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमास प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती सौ.शीला सोनुलेउपसभापती सौपूजा पोवारसदस्या सौमाधुरी व्हटकरप्रशासनाधिकारी सौजयश्री जाधवनगरसेवक सचिन शेंडेविजय माळीबाळासाहेब कांबळेसंजय शिंदेदिलीप शिरगावे व विलास पिंगळे यांच्यासह शिक्षकविद्यार्थी व पालक उपस्थित होते.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र मुख्याध्यापक विलास पिंगळे यांनी केलेसूत्रसंचालन सौमनिषा पांचाळ यांनी केलेतर आभार प्रभाकर लोखंडे यांनी मानलेकार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

पुण्यातील डीजेविरोधी जनचळवळीला ‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा पाठिंबा

पुण्यातील डीजेविरोधी जनचळवळीला ‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा प…