Home सामाजिक नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला शुभारंभ

नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला शुभारंभ

2 second read
0
0
10

no images were found

नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला शुभारंभ

कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. राजेंद्रनगर परिसरातील विकासकामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राजेंद्रनगरमधील रेव्हेन्यू सोसायटीमध्ये गटर बांधण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, आमदार अमल महाडिक आणि महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. राजेंद्रनगरसह आजूबाजूच्या परिसरातील विकासकामांसाठी केंद्र, राज्य शासन आणि महापालिकेच्या स्वनिधीतून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवल्याचे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. राजेंद्रनगरमध्ये भूमीगत गॅस वाहिनी टाकलेल्या रस्त्यातील चर मुजवण्यासाठी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. आर. डी. भोसले नगर मध्ये रस्ता डांबरीकरणासाठी १४ लाख रुपये, तसेच रेव्हेन्यु सोसायटीमधील गटर बांधकामासाठी ७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. एकूण ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर असून, या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर प्रा. जयंत पाटील आणि शारंगधर देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक १७ मधील विविध विकासकामांसाठी २ कोटी ७३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामध्ये रस्ता आणि गटर बांधणी, रस्ता कॉंक्रिटीकरण, भूमीगत वाहिन्यांसाठी खोदलेल्या चरी हॉटमिक्स डांबरीकरणाने मुजवणे अशा कामांचा समावेश आहे. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख, प्रियंाका कांबळे, विश्‍वविक्रम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्रनगरमधील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. राजेंद्रनगर तसेच प्रभाग क्रमांक १७ मध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, महापौर रुपाराणी निकम प्रयत्नशील आहेत. या भागाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी दिली. यावेळी परिवहन समिती सदस्य नामदेव नागटिळे, सागर कांबळे, राजू इंदलकर, रोहन शिंदे, समाधान बनसोडे, भारत कोकाटे, अक्षय रजपूत, महादेव घोलप, शिवाजी सकट, मारुती काळे, संपदा काळे, अमोल कांबळे, प्रशांत मोरे, अमित साखरे, प्रसाद पाटोळे, बालाजी रोडगे, दत्ता लोखंडे, अजय कांबळे, गुणवंत नागटिळे, महादेव बिरजे, सुखदेव वाघमारे, संजय लोखंडे, बंकट सूर्यवंशी, महेश चव्हाण, सुखदेव बुध्याळकर, सावळा वाघमारे, इम्तियाज गडकरी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – मंदिर महासंघाचे निवेदन

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू…