Home Uncategorized कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य समितीची पहिली सभा पार

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य समितीची पहिली सभा पार

10 second read
0
0
15

no images were found

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य समितीची पहिली सभा पार

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शहरातील सर्व दवाखाने व त्यांची सद्यस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने आरोग्य समितीची पहिली सभा आज स्थायी समिती सभागृहात आरोग्य समिती सभापती सौ.सुरेखा ओटवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी बैठकीस उपस्थित सर्व मान्यवर सभासद यांचे स्वागत केले. तसेच शहरातील सर्व दवाखाने व त्यांची सद्यस्थिती बाबत माहिती दिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे निधी अंतर्गत शहरास प्राप्त झालेल्या निधीची व नियोजीत कामांची स्थिती निदर्शनास आणून यावेळी चर्चा करण्यात आली. शहरातील डेंग्यु, रेबीज, कचरा उठाव, स्वच्छता तसेच महानगरपालिकेकडील उपलब्ध मनुष्यबळ, कामगारांच्या समस्या व इतर विषयांवर सदर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. 

 उपसभापती वैभव माने यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व पंचगंगा रुग्णालयाकडे वॉर्ड बॉय व आया कम स्विपर, ड्रेसर इत्यादी कर्मचाऱ्यांची कमतरता असलेबाबत प्रश्न उपस्थित केला. शहरातील सर्व आरोग्य केंद्राच्या इमारतीची डागडुजी व सुलभ शौचालय बाबत प्रश्न उपस्थित केला. 

 सदस्य सौ.स्वाती येवलूजे यांनी शहरातील फिजीओथेरपी सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी भरती बाबत तात्काळ पुर्तता करण्याचे निर्देशित दिले. चर्चेमध्ये सर्व सदस्यांनी भाग घेतला. सदर बैठकीमध्ये शहरातील महानगरपालिकेचे सर्व दवाखाने यांच्या समस्यांबाबत तसेच इतर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.  

        आरोग्य समिती सभापती सौ.सुरेखा ओटवकर यांनी या सर्व समस्यांबाबत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून शहराचे सर्व प्रश्न सोडवीनेबाबत प्राधान्य देऊ असे आश्वासीत केले. यावेळी आरोग्य समितीचे सर्व सदस्य, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, अधिक्षक सागर कांबळे व रुग्णालयाकडील मेडीकल ऑफिसर व आरोग्यविभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन कोल्हापूर (प्रतिनिधी):-शिवाजी …