Home पर्यावरण रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; RRR तंत्रज्ञानाद्वारे पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव

रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; RRR तंत्रज्ञानाद्वारे पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव

23 second read
0
0
8

no images were found

रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; RRR तंत्रज्ञानाद्वारे पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव

 
कोल्हापूर, : रंकाळा तलावाची निर्मिती सन 1883 मध्ये झाली असून, तलावाची परिघ लांबी सुमारे 6 कि.मी., सरासरी खोली 4.5 मीटर आणि पाणीसाठवण क्षमता अंदाजे 47 लाख घनमीटर आहे. सुमारे 107 हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेला रंकाळा तलाव हा कोल्हापूर शहरातील महत्त्वाचा जलस्रोत असून, त्याचे पर्यावरणीय संवर्धन करणे आवश्यक आहे.
रंकाळा तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासोबतच तलाव व त्याच्या पाणलोट क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपाययोजना करण्याचे प्रस्तावित आहे. या उपाययोजनांमुळे तलावाचे संवर्धन, पर्यावरणीय आरोग्य सुधारणा तसेच तलावाची नैसर्गिक परिसंस्था जतन करण्यास मदत होणार आहे. 
रंकाळा तलावाच्या स्थानिक परिसंस्थेचे पुनरुत्थान, पुनर्स्थापना व पुनरुज्जीवन (RRR)
रंकाळा तलावातील पाण्याची गुणवत्ता आणि स्थानिक परिसंस्था सुधारण्यासाठी तलावाच्या जलक्षेत्रामध्ये COWNOMICS या पेटंट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थानिक परिसंस्थेचे पुनरुत्थान, पुनर्स्थापना व पुनरुज्जीवन (Resurrection, Restoration & Rejuvenation – RRR) करण्याचे प्रस्तावित आहे.
या प्रक्रियेची सुरुवात तलावाच्या जलस्रोताचा सविस्तर अभ्यास व स्थळ पाहणी करून करण्यात येणार आहे. त्यानंतर संशोधन पथकाकडून उपचारासाठी आवश्यक वनस्पतीजन्य अर्काची तयारी केली जाईल. प्रस्तावानुसार हे औषध 100 टक्के वनस्पतीजन्य अर्कापासून तयार केले जाणार असून, स्थानिक कृषी-हवामान क्षेत्रातील निवडक वनस्पतींच्या समूहातून ते तयार केले जाते.
तयार करण्यात आलेला द्रवरूप संकेंद्रित अर्क त्याच कृषी-हवामान क्षेत्रातील ताज्या पिण्यायोग्य पाण्यात विरळ करून सूर्योदयाच्या वेळी तलावाच्या पाण्यात सोडला जाणार आहे. सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत हे द्रावण जल-परिसंस्थेमध्ये कार्यान्वित होऊन तलावातील नैसर्गिक प्रक्रियांना चालना देण्याची संकल्पना आहे.
या उपचारामध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या पुनरुत्थान टप्प्यात दररोज डोसिंग करण्यात येणार आहे.
 
या प्रक्रीयेचे तीन टप्पे आहेत यामध्ये टप्पा क्रं. १ :- पुनरुज्जीवन (Rejuvenation) (६ महिने कालावधी): दररोज येणाऱ्या प्रदूषणाच्या भारानुसार जलस्रोताची contamination digestion क्षमता समायोजित करण्यावर भर. अशा प्रकारे एकूण १२ महिन्यांचा उपचार कालावधी नमूद करण्यात आला आहे.
टप्पा क्रं. २ : पुनर्स्थापना (Restoration) (३ महिने कालावधी): तळाशी साचलेल्या sludge च्या Consumption/Digestion द्वारे जलस्रोताची water-holding capacity पुनर्स्थापित करण्यावर भर.
टप्पा क्रं. ३ : पुनरुत्थान (Resurrection) (३ महिने कालावधी): स्थानिक microbiota चे पुनरुज्जीवन करण्यावर भर. दस्तऐवजानुसार दुर्गंधी व डासांची संख्या कमी होणे तसेच TDS, TSS आणि COD मध्ये सुधारणा दिसून येते.
या प्रक्रियेमधील निष्कर्ष : Cownomics Technology मध्ये जलस्रोतामध्ये थेट रासायनिक/भौतिक हस्क्षेप करण्याऐवजी स्थानिक जल-परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करून प्रदूषणाचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. दस्तऐवजामध्ये ही पद्धत जलस्रोत व Wetlands च्या पुनरुज्जीवनासाठीची शाश्वत पद्धत म्हणून सादर केली आहे.
या संपूर्ण एक वर्षाच्या कालावधीत तलावातील पाणी, गाळ आणि हवेच्या गुणवत्तेचे नियमित परीक्षण करण्यात येणार असून, त्याआधारे उपचार प्रक्रियेचा परिणाम व तलावाच्या पर्यावरणीय स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
रंकाळा तलावाचे जलसंवर्धन, नागरिकांची सुरक्षितता आणि स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण या तिन्ही बाबींचा समतोल साधत तलावाचा दीर्घकालीन पर्यावरणपूरक विकास करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In पर्यावरण
Comments are closed.

Check Also

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन कोल्हापूर (प्रतिनिधी):-शिवाजी …