no images were found
इंडिया’ची मुंबई ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होणार बैठक
‘इंडिया’च्या मुंबईतील आगामी बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चेबरोबरच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही निर्णय घेतले जाणार आहेत.
मुंबईत येत्या 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला सांताक्रूझच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून त्याची तयारी जोमात सुरू आहे. या बैठकीपूर्वी 23 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होणार आहे.
त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस व घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.’इंडिया’ बैठकीमध्ये देशभरातील व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. देशभरातील विरोधी पक्षांमधील सुमारे 80 नेते हजर राहणार आहेत. त्यात पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असणार आहे.
बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाकडे आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही प्रमुख पक्ष समन्वयाने बैठकीच्या आयोजनाच्या तयारीत गुंतले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी या बैठकीच्या तयारीची माहिती घेतली होती.