no images were found
सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर तीन दिवस बंद
कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या सर्जिकल विभागाकडील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटरचे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार, दि. 29 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तीन दिवस करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत सर्जिकल विभागाकडील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर तीन दिवस बंद राहणार आहे. मंगळवार, दि.1 सप्टेंबर 2026 रोजी स्वॅब रिपोर्ट आल्यानंतर कामकाज सुरु होणार आहे. तरी या कालावधीत संबंधीत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे रुग्णसेवेचा लाभा घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.