Home Uncategorized पंचगंगा स्मशानभूमीतील धोकादायक स्वागत कमान सुरक्षितरित्या उतरविली

पंचगंगा स्मशानभूमीतील धोकादायक स्वागत कमान सुरक्षितरित्या उतरविली

1 min read
0
0
6

no images were found

पंचगंगा स्मशानभूमीतील धोकादायक स्वागत कमान सुरक्षितरित्या उतरविली

कोल्हापूर,  : महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी येथील अंदाजे 40 वर्षे जुनी स्वागत कमान धोकादायक बनल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज महापालिकेच्या वतीने ती सुरक्षितरित्या उतरविण्यात आली.

                 सदर स्वागत कमानीचे स्ट्रक्चरल इंजिनिअरमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या पाहणीमध्ये कमान अत्यंत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्या अहवालानुसार सदर कमान पाडण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास स्थायी समितीची मान्यता मिळाली होती.

              त्यानुसार आज, दि. 27 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय क्रमांक 2 च्या वतीने कर्मचारी व मशिनरीच्या सहाय्याने सदर धोकादायक स्वागत कमान सुरक्षितरित्या उतरविण्याची कार्यवाही करण्यात आली.

                 सदरची कारवाई सहा.आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे व विभागीय कार्यालयाकडील कर्मचारी आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत तपास प्रक्रियेला गती द्या   -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत तपास प्रक्रियेला गती द्या   -जिल्हाधिकारी डॉ. विजय रा…