Home Uncategorized एईएसएलला महाराष्ट्रात मिळाला 4,700 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प

एईएसएलला महाराष्ट्रात मिळाला 4,700 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प

3 second read
0
0
6

no images were found

एईएसएलला महाराष्ट्रात मिळाला 4,700 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प

  • 4,500 मेगावॅट अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक क्षमतेच्या वीजेचे वहन होणार
  • प्रकल्प 36 महिन्यांत पूर्ण करून राष्ट्राला समर्पित केला जाणार

अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठी खासगी ट्रान्समिशन आणि वितरण कंपनी अदाणी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड (एईएसएल) ला महाराष्ट्रात एक महत्त्वाचा ट्रान्समिशन प्रकल्प प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाद्वारे अक्षय ऊर्जेतून निर्मित वीज मोठ्या वीज वापर केंद्रांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. सुमारे 4,700 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) येथे वाढणाऱ्या पम्प्ड स्टोरेज प्रणालीलाही बळकटी मिळणार आहे.

नेटवर्क एक्स्पान्शन स्कीम इन वेस्टर्न रिजन टू कॅटर टू पम्प्ड स्टोरेज पोटेन्शियल नियर सातारा (अप टू 4500 मेगावॅट) – पार्ट ए” या नावाचा हा प्रकल्प टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग (टीबीसीबी) प्रक्रियेद्वारे प्राप्त झाला असून, या प्रक्रियेत एईएसएल ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली.

स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) सातारा पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड अंतर्गत राबविण्यात येणारा हा प्रकल्प 36 महिन्यांत पूर्ण करून राष्ट्राला समर्पित केला जाईल. या प्रकल्पामुळे एईएसएलच्या पोर्टफोलिओमध्ये 562 सर्किट किलोमीटर (सीकेएम) ट्रान्समिशन लाईन्स आणि 9,000 एमव्हीए ट्रान्सफॉर्मेशन क्षमतेची भर पडणार आहे. यानंतर कंपनीचे एकूण ट्रान्समिशन नेटवर्क 29,739 सीकेएमपर्यंत, तर ट्रान्सफॉर्मेशन क्षमता 1,43,425 एमव्हीएपर्यंत वाढणार आहे.

अदाणी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कंदर्प पटेल म्हणाले, “पम्प्ड स्टोरेज प्रकल्प भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर अक्षय ऊर्जेला ग्रीडशी जोडण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता आणि विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध करून देणे सुलभ होते. सातारा ट्रान्समिशन प्रकल्प अक्षय ऊर्जेचे वहन आणि ऊर्जा साठवणूक वाढविण्यासाठी आवश्यक ट्रान्समिशन नेटवर्क उभारेल तसेच दक्षिण आणि पश्चिम भारतातील वीज प्रवाह अधिक सक्षम करेल. अक्षय ऊर्जेचा विस्तार, ग्रीडची स्थिरता आणि भारताच्या दीर्घकालीन डीकार्बोनायझेशन उद्दिष्टांना गती देणारी आधुनिक ट्रान्समिशन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एईएसएल कटिबद्ध आहे.”

या प्रकल्पांतर्गत सातारा येथे 765/400 केव्ही उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर–सातारा 765 केव्ही दुहेरी परिपथ (डबल-सर्किट) ट्रान्समिशन लाईन उभारली जाणार असून, कोल्हापूर पूलिंग स्टेशनची क्षमता वाढविण्यासह त्यास आवश्यक असलेली ट्रान्समिशन पायाभूत सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत.

भारत 2030 पर्यंत 500 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमता उभारण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत ट्रान्समिशन पायाभूत सुविधा ही संपूर्ण व्यवस्थेचा कणा ठरणार आहे. एईएसएल देशभरात अशा विशेष ट्रान्समिशन प्रणाली विकसित करत आहे, ज्या सौर, पवन आणि पम्प्ड स्टोरेजसारख्या अक्षय ऊर्जेने समृद्ध भागांना मोठ्या औद्योगिक तसेच शहरी वीज वापर केंद्रांशी जोडतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झाला उत्साहपूर्ण वातावरणात

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झा…