no images were found
कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचा आरटीओवर मोर्चा
कोल्हापूर: ओटीपी सक्ती रद्द करा…. आमच्या मागण्या मान्य करा….अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशन ने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी कार डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली.आणि सर्व वस्तुस्थिती समजावून घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी निवेदन स्वीकारले. यातून तात्काळ
योग्य तो मार्ग काढण्याची ग्वाही दिली. काळे टी शर्ट परिधान करून सासने मैदानावरून मोर्चास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चाची समाप्ती झाली.
गेली १ ते २ महिने कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पोर्टल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहन खरेदी-विक्री, नाव हस्तांतरण आणि नवीन नोंदणी ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून सर्वसामान्य नागरिक व कार डीलर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशन चे इजाज नागरकट्टी यांनी केला. कोल्हापूरसह संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे.यामध्ये असोसिएशनने काही मागण्या केलेल्या आहेत.
*असोसिएशनच्या प्रमुख मागण्या:*
पोर्टल तातडीने सुरू करा – २ महिन्यांपासून बंद असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत.
PUC साठी OTP सक्ती रद्द करा – PUC चा OTP शी संबंध नाही. बंद नंबर/परदेशातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच सहा वेळा ओटीपी येणे बंद करावे.
पूर्वसूचना द्या – अचानक नियम लावणे बंद करा. हे नियम गोवा, कर्नाटक, गुजरात मध्ये लागू का नाहीत? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
वाहन हस्तांतरण प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत.
नागरीकांची गैरसोय टाळून ऑनलाइन प्रणाली सुलभ करावी.
प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत. अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी सचिव इजाज नागरकट्टी, विक्रम मोतीपुरे, जमीर सय्यद ,अभिजीत चित्रकार, सुधाकर सासने,प्रशांत पाटील, किरण पाटील, समीर मुल्ला, फैयाज अथणीकर, महेश सकपाळ, शितल दत्तवाडे, समीर तकीलदार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.