no images were found
आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सने ने केला आपल्या नेटवर्क चा विस्तार
मुंबई:आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“एबीएचएफएल”) या आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या उपकंपनीने पणजी येथे राज्यातील पहिल्या शाखेचा शुभारंभ करून गोव्यात प्रवेश केला आहे. ही नवीन शाखा एबीएचएफएलच्या संपूर्ण भारतात वितरण नेटवर्कचा विस्तार करण्याच्या आणि उदयोन्मुख व उच्च-क्षमता असलेल्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांसाठी हाऊसिंग फायनान्स सोल्यूशन्सची उपलब्धता सुलभ करण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे.गोव्याची राजधानी पणजी गृहनिर्माणाची सातत्याने वाढती मागणी असलेले एक महत्त्वाचे निवासी, व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्र आहे. गतिमान अर्थव्यवस्था, विस्तारणाऱ्या पायाभूत सुविधा, समृद्ध पर्यटन परिसंस्था आणि घर खरेदीदारांमधील वाढत्या आकांक्षांमुळे हे शहर नोकरदार, स्वयंरोजगार असलेले व्यक्ती, व्यवसाय मालक आणि दर्जेदार गृहनिर्माण सोल्यूशन्सच्या शोधात असलेल्या कुटुंबांना आकर्षित करते. गोव्यातील आपल्या पहिल्या शाखेच्या माध्यमातून एबीएचएफएलचे उद्दिष्ट ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या हाऊसिंग फायनान्स उत्पादनांची सहज उपलब्धता प्रदान करणे आणि ग्राहकांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करणे हे आहे.या लाँचच्या निमित्ताने, एबीएचएफएल शून्य लॉगइन फी सोबत ५० लाख रूपयांपर्यंतचे स्पॉट लोन सॅंक्शन (तात्काळ कर्ज मंजुरी) ऑफर करत आहे. ही ऑफर १२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वैध असेल, ज्यामुळे या नवीन शाखांमधील ग्राहकांना जलद आणि अधिक परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवणे शक्य होईल.या विस्तारीकरणाबाबत मत व्यक्त करत आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी व सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “गोवा आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील प्रबळ मागणी आणि वाढत्या महत्त्वाकांक्षा पाहता ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमची प्रादेशिक उपस्थिती वाढवत आहोत. आमच्या वाढत्या वितरण नेटवर्कला प्रबळ डिजिटल क्षमतेची जोड देऊन ग्राहकांसाठी घर खरेदीचा प्रवास सोपा, जलद आणि त्रासरहित बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”