Home Uncategorized महापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण

महापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण

43 second read
0
0
6

no images were found

महापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली  पुष्पचक्र अर्पण

कोल्हापूर :- महापालिकेच्यावतीने हुतात्मा स्मारक, प्रतिभानगर, सागरमाळ येथे क्रांती दिनानिमित्त जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने व एस.आर.पाटील, यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली, पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सभागृह नेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, व अनेक मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी राष्ट्रगीत, बिगुलवादन केले. तसेच स्वातंत्र्य सैनिकांची नांवे असलेल्या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

           यावेळी गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक अभिजीत मोकाशी, उपशहर अभियंता अरुण गवळी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, खादी ग्राम उद्योग उपाध्यक्ष सुंदरराव देसाई, महाराष्ट्र जेष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष दिलीप पेटकर, प्रा.रुपा शहा, प्रिया पाटील, माजी नगरसेवक अशोक जाधव, जनार्दन पवार, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. हुतात्मा स्मारक परिसरात नगरसेवक अभिजीत मोकाशी, सभागृह नेता मुरलीधर जाधव व स्थायी समिती सभापती विशाल शिराळे  यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

यानंतर शास्त्रीनगर येथील लालबहाद्दुर शास्त्री यांच्या पुतळयास तसेच हुतात्मा पार्क मधील क्रांतीवीर कै.दत्तोबा तांबट  स्वातंत्र्यसैनिक कै.बळवंतराव बराले यांच्या पुतळयांनाही पुष्पहार अर्पण केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गोरगरीबांचे रेशन तात्काळ सुरू करावे ; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन व जोरदार निदर्शने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)..

गोरगरीबांचे रेशन तात्काळ सुरू करावे ; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन व जोरदार निदर्शने (…