
no images were found
सामाजिक कार्याचा वसा चालवणाऱ्या मधुरिमाराजे छत्रपती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..
कोल्हापूर : माजी आरोग्यमंत्री, पिताश्री स्वर्गिय दिग्वीजय खानविलकर यांच्याकडूनच त्यांना समाजकारणाच बाळकडू मिळालं……. त्या बळावर त्यांनी अफाट जनसंपर्क केला. प्रत्येकाची सुख – दुःख समजून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं.समाजातील प्रत्त्येक घटकाशी त्या एकरूप झाल्या आहेत. महाराजकुमार ‘ मालोजीराजे छत्रपती ‘ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वंशात त्या दाखल झाल्या. पुर्वीपासूनच त्यांच्यावर राजर्षी शाहूं राजेंच्या विचारांचा पगडा असल्यानं या विचाराला वाहून घेत राजघराण्याला शोभेल अस कार्य त्यांच्या हातून घडतय. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्या आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत आहेत. भाषण कौशल्य ही त्यांची सर्वात महत्त्वाची जमेची बाजू….. फुटबॉल प्रेमी बेबीराजे अशी त्यांची समाजात ओळख आहे. फुटबॉल क्षेत्रात देखील ऑल इंडिया पातळीवर त्या कार्यरत आहेत. काही संस्थांच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने या क्षेत्रातील विविध कार्यात देखील त्या सक्रिय असतात. चांगल्याची कास धरून सर्वांना न्याय देण, सर्वांच्या प्रश्नांची सोडवणूक करण, हा एकच ध्यास घेऊन त्या आजवर समाजात कार्यरत असतात. या सर्वच कारणांमुळ त्यांच्याशी जिव्हाळा असलेल्या शहरातील विविध व्यक्ती, तालीम संस्था, पेठा आणि मंडळातून त्यांना विधिमंडळात पाठवण्याच नियोजन सुरू आहे. शहराच्या विकासासाठी ‘ लोकप्रतिनिधी ‘ म्हणून त्या ‘ विधिमंडळात ‘ जाव्यात आणि त्यांच्या रूपातून कोल्हापूर शहराचा क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यासह सर्वच क्षेत्राचा विकास व्हावा हीच या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा……..