no images were found
राधानगरी १०० टक्के भरले ; 35 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले
कोल्हापूर, : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.35 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3 व 6 हे खुले झाले असून या स्वयंचलित द्वारामधून 2856 व पावर हाऊस मधून 1400 असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, कुंभी नदीवरील- सांगरुळ दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली,खोची व चावरे वेदगंगा नदी वरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, ऐनापूर व निलजी असे एकूण 35 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी)- राधानगरी 8.35 ( 100 टक्के), तुळशी 2.92 (84.23 टक्के), वारणा 29.48 (85.71 टक्के), दूधगंगा 16.54 (65.14 टक्के), कासारी 2.33 (83.97 टक्के), कडवी 2.50 (99.5 टक्के), कुंभी 2.16 (79.67 टक्के), पाटगाव 2.61 (70.18 टक्के), चिकोत्रा 0.85 (56.1 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.15 (92.77 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (33.97 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 30.9, सुर्वे 30.5, रुई 60.10, इचलकरंजी 57.9, तेरवाड 52, शिरोळ 44, नृसिंहवाडी 41.6 तर नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे 19.8 फूट इतकी पाणीपातळी आहे.