no images were found
जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील संघ निवड बुद्धिबळ स्पर्धेत अथर्वराज ढोले व नारायणी घोरपडे अजिंक्य ; आदिराज डोईजड व सांची बजाज उपविजेते तर अवनीश जितकर व श्रुती पांडव तृतीय स्थानी
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील मुला मुलींची संघ निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेतून तीन मुले व दोन मुली असा खालील प्रमाणे एकूण पाच जणांचा कोल्हापूर जिल्ह्याचा अधिकृत संघ निवडण्यात आला.
मुले 1) अथर्वराज ढोले कोल्हापूर 2) आदिराज डोईजड वारणानगर 3) अवनीश जितकर कोल्हापूर
मुली :- 1) नारायणी घोरपडे कोल्हापूर 2) सांची बजाज इचलकरंजी
चंद्रपूर येथे दहा ते बारा जुलै दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी वरील कोल्हापूर जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ सविता जितकर अमोल ढोले व वृषाली सूर्यवंशी-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भरत चौगुले, मनीष मारूलकर, आरती मोदी, सचिन वनिरे व महेश व्यापारी उपस्थित होते.
मुलांच्या गटात अंतिम सहाव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर कोल्हापूरचा अथर्वराज ढोले विरुद्ध वारणानगर चा आदिराज डोईजड यांच्यातील डाव बरोबरीत सुटल्यामुळे अथर्वराज साडेपाच गुणासह अजिंक्य ठरला तर आदिराज ला पाच गुणांसह उपविजेतेपद मिळाले. दुसऱ्या पटावर कोल्हापूरच्या अवनीश जितकरने शिरोळच्या हर्ष मादनाईक चा पराभव करून पाच गुणासह तृतीय स्थान मिळविले.
मुलींच्या गटात अंतिम पाचव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर नारायणी घोरपडे व श्रुती पांडव यांच्यातील सामन्यात बरोबरी झाली तर दुसऱ्या पटावर इचलकरंजीच्या सांची बजाज ने गगनबावड्याच्या काव्यांजली पडवळ ला पराभूत केले. नारायणी घोरपडेने साडेचार गुनासह अजिंक्यपद पटकाविले. सांची बजाजला चार गुणासह उपविजेतेपद मिळाले तर श्रुती पांडवला साडेतीन गुणामुळे तृतीय स्थानी रहावे लागले.
उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट :- शिवांश सुतार इचलकरंजी व नक्षत्रा कांबळे कोल्हापूर
सात वर्षाखालील उत्कृष्ट :- रिशान पिळणकर कोल्हापूर व ईनाया मुजावर कोल्हापूर