Home स्पोर्ट्स जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील मुला मुलींचे बुद्धिबळ स्पर्धेत काव्यांजली, नारायणी, वन्शिल, अथर्वराज व अवनीश आघाडीवर

जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील मुला मुलींचे बुद्धिबळ स्पर्धेत काव्यांजली, नारायणी, वन्शिल, अथर्वराज व अवनीश आघाडीवर

1 second read
0
0
11

no images were found

जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील मुला मुलींचे बुद्धिबळ स्पर्धेत काव्यांजली, नारायणी, वन्शिल, अथर्वराज व अवनीश आघाडीवर

कोल्हापूर :- अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आज प्रारंभ झाल्या.
या स्पर्धेत इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज वारणानगर, गगनबावडा व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत 52 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. यापैकी दहा बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन अनिता महाजन व के डी लोकरे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी भरत चौगुले, मनिष मारूलकर,उत्कर्ष लोमटे, आरती मोदी, सचिन वनिरे व महेश व्यापारी उपस्थित होते. या स्पर्धा जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन व कल्पना प्रकाश फाउंडेशन यांनी पुरस्कृत केल्या आहेत तर युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेस चे कॅप्टन उत्तम पाटील यांनी स्पर्धेसाठी हॉल उपलब्ध करून देऊन सहकार्य केले आहे.
आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर मुलांच्या गटात तृतीय मानांकित वन्शील ठक्कर, पाचवा मानांकित अथर्वराज ढोले व सहावा मानांकित अवनीश जितकर हे तिघेजण तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. चौथा मानांकित आदिराज डोईजड, सुबोध कुलकर्णी व वीर सूर्यवंशी पाटील हे तिघेजण अडीच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीनंतर काव्यांजली पडवळ व नारायणी घोरपडे या दोघीजणी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. श्रुती पांडव, सांची चौधरी, सांची बजाज, शनाया मालानी व नक्षत्रा कांबळे या पाच जणी दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

आपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

आपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा – जिल्हाधिकारी डॉ…