no images were found
आमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून 500 एलईडी दिवे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पथदिवे नादुस्त अवस्थेत असल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील व उपनगरातील भागात पथदिवे बंद असल्यामुळे आंधाराचे साम्राज्य वाढले आहे. त्याचबरोबर नागरीकांना समस्यांना सामना करावा लागत होता. ही बाब ध्यानात घेऊन आमदार अमल महाडीक यांनी शहरातील बंद पडलेले पथदिवे बदलण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. पथदिवे बदलण्याचा आर्थिक भार महापालिकेवर न टाकता लोक सहभागातून पथदिवे उपलब्ध करण्याची ग्वाही आमदार महाडीक यांनी दिली होती. आमदार अमल महाडीक यांनी महापालिकेस 2500 एलईडी दिवे देण्याचे जाहिर केले आहे. त्या अनुषंगाने आज महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात आमदार अमल महाडीक यांनी पाहिल्या टप्प्यामध्ये 500 एलईडी दिवे महापालिकेकडे सुपूर्द केले. हे दिवे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती उप-सभापती सौ.दिपा ठाणेकर, सभागृहनेता मुरलीधर जाधव, प्रभाग समिती सभापती वैभव कुंभार, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, नगरसेवक जयंत पाटील, विजय जाधव, विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका सौ.सृष्टी जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजीराव पाटील, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, अजित ठाणेकर, निलेश देसाई, सहा.अभियंता विद्युत नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी उपस्थित होते.