Home पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिक्षणशास्त्र अधिविभागात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिक्षणशास्त्र अधिविभागात वृक्षारोपण

12 second read
0
0
10

no images were found

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिक्षणशास्त्र अधिविभागात वृक्षारोपण

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावर्षीच्या “Inspired by Nature: For Climate, For Our Nature” या संकल्पनेला अनुसरून विविध फुलझाडे, औषधी व आयुर्वेदिक वनस्पती तसेच देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक विद्यालय, कोल्हापूर येथील डॉ. गौतम माने, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी येथील डॉ. प्रल्हाद दराडे तसेच आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा येथील डॉ. केशव मोरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

      याप्रसंगी डॉ. सुप्रिया पाटील, सरस्वती कांबळे, डॉ. विजय सदामते, अजय तरंगे, कादंबरी खांडेकर, संजना भालकर, संगीता माने, अतुल जाधव, संजीवनी पवार, रोहित माने,  तसेच त्रिशला तमाईचिकर, तेजस्विनी कांबळे, किरण पवार, अक्षय कांबळे आणि रवींद्र गुरव यांनी वृक्षारोपणामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In पर्यावरण
Comments are closed.

Check Also

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयएचसीएल जबाबदार आदरातिथ्याकरिता वचनबद्ध

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयएचसीएल जबाबदार आदरातिथ्याकरिता वचनबद्ध  मुंबई, : जागतिक…