Home क्राईम पत्नीने मुलाच्या मदतीने पतीची हत्या करून केले ६ तुकडे, श्रद्धा हत्याकांडाची पुनुरावृती

पत्नीने मुलाच्या मदतीने पतीची हत्या करून केले ६ तुकडे, श्रद्धा हत्याकांडाची पुनुरावृती

0 second read
0
0
162

no images were found

पत्नीने मुलाच्या मदतीने पतीची हत्या करून केले ६ तुकडे, श्रद्धा हत्याकांडाची पुनुरावृती

कोलकाता : पश्चिम बंगाल येथील बरुईपूर भागामध्ये. पत्नीनं मुलासोबत मिळून आपल्याच पतीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे सहा तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. अखेर हे प्रकरण उघडकीस आलंय. १५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या हत्याकांडप्रकरणी आता महत्त्वाचे धागेदोरे हाती आलेत. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रमाणेच पश्चिम बंगाल हे हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे.
उज्ज्वल चक्रवर्ती असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते मार्जी सैनिक होते. ही हत्या त्यांच्या पत्नीने आणि मुलाने केली. उज्ज्वल हे पत्नी आणि मुलाचा छळ करत होते. छोट्या मोठ्या कारणावरुन बायको मुलासोबत हिंसक वागणाऱ्या उज्ज्वल यांचा त्यांच्या पत्नी आणि मुलानेच काटा काढला. त्यांनी गळा दाबून उज्ज्वल यांची हत्या केली. यावेळी त्यांच्या किंकाळ्या कुणाला ऐकू येऊ नयेत म्हणून मुलाने टीव्हीचा आवाजही वाढवून ठेवला होता. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे ६ तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रमाणेच हेही हत्याकांड घडलं होतं.
उज्ज्वल चक्रवर्ती यांच्या मुलानेच वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी दिली होती. दरम्यान, मुलगा आणि पत्नी पहिल्यापासूनच पोलिसांच्या निशाण्यावर होते. त्यादरम्यान, पोलिसांनी उज्ज्वल यांच्या मृतदेहाचे तुकडेही शोधून काढले आणि पत्नीसह मुलालाही ताब्यात घेतलं. मायलेकाची चौकशी केली असता पोलिसांसमोर संपूर्ण हत्यांकाडाचा उलगडा झाला. उज्ज्वल हा आपल्या पत्नीला आणि मुलाला वारंवार मारहाण करत होता. त्यांच्यात सारखी भांडणं होत होती. शेजारच्यांना पहिल्यापासून हत्येची शंका होती. अखेर उज्ज्वल बेपत्ता असल्याची पोलीस तक्रार दाखल झाली आणि तिथून हत्याकांडाच्या तपासाला सुरुवात झाली. उज्ज्वल चक्रवर्ती हे मार्जी सैनिक असल्याचीही माहिती समोर आलीय.
दोन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर पोलिसांना उज्ज्वल यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले होते. त्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना फार वेळ लागला नाही. गेल्या चार वर्षांपासून चक्रवर्ती कुटुंबात कहल सुरु होता. दररोज पतीपत्नी यांच्यात भांडणं व्हायची. दारु पिऊन येत उज्ज्वल पत्नीला छळत होता, असं शेजाऱ्यांनीही सांगितलंय. इतकंच नाही तर कधी कधी तर भर रस्त्यातही तो पत्नीवर हात उचलायचा. 10 वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झालेल्या उज्ज्वल चक्रवर्ती यांच्या वागणुकीने कुटुंबीय त्रस्त झाले होते. अखेर पत्नी आणि मुलानेच एक वेळ पाहून गळा दाबून उज्ज्वल यांची हत्या केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …