Home पर्यावरण फुल दिले की फुलच मिळते, दगड दिले की दगडच मिळते, त्यामुळे कुणी टीका केली तर शांत राहायचं. कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही. – जॅकी श्रॉफ

फुल दिले की फुलच मिळते, दगड दिले की दगडच मिळते, त्यामुळे कुणी टीका केली तर शांत राहायचं. कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही. – जॅकी श्रॉफ

1 min read
0
0
8

no images were found

फुल दिले की फुलच मिळते, दगड दिले की दगडच मिळते, त्यामुळे कुणी टीका केली तर शांत राहायचं. कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही. – जॅकी श्रॉफ

जॅकी दादाच्या उपस्थितीने विट्याची ट्री आर्मी जागतिक नकाशावर- आमदार सुहास बाबर

    खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर म्हणजे पिंपळाच्या झाडासारखा सळसळता उत्साह आहे. त्याला वाढविण्याची, जपण्याची आणि पाणी घालण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे,” अशा हृदयस्पर्शी शब्दांत ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचे कौतुक करत ट्री आर्मीच्या वृक्षलागवड चळवळीला भक्कम पाठिंबा दिला. गार्डी घानवडच्या माळावर ट्री आर्मी आणि जेके फाउंडेशनच्या माध्यमातून साडेचार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या लोकचळवळीचा औपचारिक शुभारंभ झाला.

     कार्यक्रमात बोलताना जॅकी श्रॉफ यांनी आमदार बाबर यांच्या साधेपणा, कार्यतत्परता आणि पर्यावरणावरील प्रेमाचे विशेष कौतुक केले.“फक्त बोलणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे यांच्यात फरक असतो. सुहास बाबर हे बोलण्याइतकेच कृतीतही प्रामाणिक आहेत,” असे सांगत त्यांनी वृक्षलागवडीच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. पृथ्वी ही आपली आई असून तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, असा संदेशही त्यांनी दिला.

     आमदार सुहास बाबर यांनी ट्री आर्मी ही कोणत्याही पक्षाची नव्हे तर समाजाची चळवळ असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याइतकी झाडे लावण्याचा संकल्प केला असून पुढील दोन वर्षांत ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जॅकी श्रॉफ यांच्या सहभागामुळे या मोहिमेला राष्ट्रीय ओळख मिळणार असून विट्यातून सुरू झालेली ट्री आर्मी आता देशभर आणि जगभर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      या कार्यक्रमाला मुंबईहून जॅकी श्रॉफ यांचे मित्र, ड्रीम वर्थ सोल्युशन या कंपनीचे संचालक उपस्थित होते. तसेच खानापूर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा भोसले, नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, उपसभापती सुहास शिंदे यांची ,माजी नगरसेवक अमर शितोळे, नविन यात्रा कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, प्रकाश बागल, नगरसेवक रामचंद्र भिंगारदेवे,

     भालचंद्र कांबळे, रोहित पाटील, अँड. रोहित पवार, श्रीधर जाधव, सरपंच संग्राम नलवडे, सौरभ रोकडे, विशाल पाटील, दिलीप किर्दत, सुजय गोसावी यांच्यासह ट्री आर्मीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक फिरोज शेख यांनी केले. सूत्रसंचालन धीरज भिंगारदेवे यांनी केले. आभार राहुल साळुंखे यांनी मानले.

आमदार आले जमिनीवर

आमदार बाबर म्हणाले, मला मी खुप जमिनीवर राहुन काम करतो असे वाटायचे परंतु जॅकी दादांच्याकडे पाहिल्यावर माझा हा भ्रम फुटला आहे. एक सेलिब्रिटी असुन देखिल किती विनम्र आणि किती साधे असावे हे पाहून आवाक झालो आहे.पत्नी सोनिया बाबर यांनी जॅकी श्रॉफ यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी करून स्वागत केले. त्यानंतर बाजरीची भाकरी, तूप, गूळ आणि मीठ असा साधा नाष्टा त्यांनी केला. एवढा साधा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नसल्याचे गौरवोद्गार आमदार बाबर यांनी काढले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In पर्यावरण
Comments are closed.

Check Also

संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावेत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावेत–मुख्यमं…