Home Uncategorized महाराष्ट्रातील क्लबफूटग्रस्त मुलांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अदाणी फाउंडेशन- अनुष्का फाउंडेशनचा उपक्रम

महाराष्ट्रातील क्लबफूटग्रस्त मुलांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अदाणी फाउंडेशन- अनुष्का फाउंडेशनचा उपक्रम

0 second read
0
0
7

no images were found

महाराष्ट्रातील क्लबफूटग्रस्त मुलांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अदाणी फाउंडेशन- अनुष्का फाउंडेशनचा उपक्रम

रायगड: महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांतील क्लबफूटग्रस्त 10 हजारांहून अधिक मुलांना दर्जेदार उपचार आणि आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अदाणी फाउंडेशन आणि अनुष्का फाउंडेशन यांनी तीन वर्षांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली आहे. जागतिक क्लबफूट दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील 61 जिल्ह्यांमध्ये उपचार सुविधा, लवकर निदान आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे पाच राज्यांतील 67 क्लबफूट क्लिनिक यांना बळकटी देण्यात येणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि जनजागृतीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. महाराष्ट्रातील क्लबफूटग्रस्त बालकांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांच्या हालचाली, शिक्षण तसेच सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी प्रत्येक मुलाला चालण्याची, शिकण्याची आणि जीवनात पूर्ण सहभाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सांगत विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी संधी निर्माण करण्याच्या फाउंडेशनच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तर अनुष्का फाउंडेशनचे संस्थापक दीपक प्रेमनारायण यांनी ही भागीदारी महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये क्लबफूटवरील उपचारांची उपलब्धता वाढविण्यास आणि लवकर निदानाची यंत्रणा अधिक मजबूत करण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला.सध्या अनुष्का फाउंडेशन देशातील 13 राज्यांतील 165 जिल्ह्यांमध्ये क्लबफूट उपचार कार्यक्रमांना पाठबळ देत असून 26 हजारांहून अधिक मुलांना उपचार मिळवून देण्यात मदत केली आहे. महाराष्ट्रातील बालआरोग्य क्षेत्रासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून क्लबफूटमुक्त भविष्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याची दिशा यातून मिळणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावेत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावेत–मुख्यमं…