no images were found
आगामी महिनाभरातील सर्व अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – आमदार निरंजन डावखरे
कोल्हापूर, : भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक आज भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. भारतीय जनता पार्टी पूर्व, पश्चिम आणि महानगरचे जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी मोर्चा अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आजच्या मीटिंगचा उद्देश समजून सांगितला.
प्रारंभी प्रदेश सहसंयोजक आमदार विक्रम पाचपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करताना, आगामी सर्व कार्यक्रम केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीतून आणि जनसंपर्कातून प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त केली.
विभाग संयोजक विक्रम पावसकर यांनी संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला. ९ जून रोजी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीसाठी जिल्हानिहाय सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आगामी काळात ‘सरल ॲप’च्या माध्यमातून सर्व बैठका व कार्यक्रमांचे रिपोर्टिंग केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विभाग संयोजक विक्रम देशमुख यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. शरद लाड यांनीही पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी व्यापक नोंदणी मोहीम राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विभाग समन्वयक आमदार निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, पदवीधर नोंदणी अभियान तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त होणारे विविध उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, मंडल, जिल्हा, कोअर कमिटी, शक्ती केंद्र व बूथ प्रमुखांच्या बैठका नियमितपणे नियोजनबद्ध पद्धतीने घेणे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्यात या बैठका झाल्या पाहिजेत. प्रत्येक बूथवर संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रवास व संपर्क ठेवावा. आगामी एका महिन्याच्या कालावधीत केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून ते सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक, महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील आणि राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी गेल्या दोन महिन्यांतील संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. तसेच SIR आणि पदवीधर नोंदणी अभियानातील प्रगतीची माहिती सादर केली.
यावेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ‘मन की बात’ कार्यक्रम १०० टक्के बूथवर आयोजित करण्यात आल्याबद्दल दक्षिण विधानसभा क्षेत्रातील मंडलाध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बाचल यांनी केले. माजी प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम पाचपुते, मा विक्रम पावसकर, मा विक्रम देशमुख, आमदार आमल महाडिक, आमदार राहुल आवडे, प्रकाश आवडे, पृथ्वीराज पाटील, रामकृष्ण वेताळ, योगेश बाचल, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निबाळकर, तानाजी पाटील, विशाल शिराळे, मुरलीधर जाधव, अंबरिश घाडगे, यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.