Home Uncategorized 27,500 मिळकतधारकांनी घेतला 6 टक्के सवलत योजनेचा लाभ

27,500 मिळकतधारकांनी घेतला 6 टक्के सवलत योजनेचा लाभ

42 second read
0
0
7

no images were found

27,500 मिळकतधारकांनी घेतला 6 टक्के सवलत योजनेचा लाभ

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि. 01 एप्रिल ते  30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केल्यास महापालिका करामध्ये 6 टक्के सूट जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील 27 हजार 756 मिळकतधारकांनी या 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. यामधून 12 कोटी 11 लाख 60 हजार 949 रुपये रक्कम जमा झाली आहे.

            शहरातील 1,41,526 मिळक्तधारकांनी अद्यापही सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम जमा केलेली नाही. महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी 9:00 ते दुपारी 4:30 या वेळेत सुरु ठेवण्यात आलेली आहेत. तसेच नागरीकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घरफाळा विभागीय कार्यालयामधील व नागरी सुविधा केंद्रामधील किओस्क मशिनव्दारे ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

            तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी 30 जून 2026 अखेर आपली सन 2026-27 चालू आर्थिक वर्षाची घरफाळ्याची रक्कम भरुन महापालिका करामधील 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

नालेसफाई कामांची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणी

नालेसफाई कामांची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्…