Home Uncategorized महापालिकेच्या विविध जागा व वाहनतळांसाठी निविदा प्रक्रिया; वार्षिक उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित

महापालिकेच्या विविध जागा व वाहनतळांसाठी निविदा प्रक्रिया; वार्षिक उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित

39 second read
0
0
9

no images were found

महापालिकेच्या विविध जागा  वाहनतळांसाठी निविदा प्रक्रियावार्षिक उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या विविध मालमत्ता व वाहनतळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी इस्टेट विभागास दिले होते. या अनुषंगाने इस्टेट विभागाच्यावतीने बी वॉर्ड हॉकी स्टेडियम गाळे, सरस्वती टॉकीज शेजारील वाहनतळ व एसटी स्टॅण्ड येथील वाहनतळ विकसित करणे व चालविण्यास देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदरच्या सर्व निविदा पुढील दोन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

            यामध्ये बी वॉर्ड हॉकी स्टेडियम येथील सुमारे 4 हजार स्क्वेअर फूट गाळयांची जागा लिलाव पद्धतीने भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागेतून महापालिकेला अंदाजे 20 ते 25 लाख रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे. यावेळी निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त सुरक्षा अनामत रक्कम देणाऱ्या निविदाधारक प्राधान्य क्रमाने देण्याचा विचार महापालिकेचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. तसेच महापालिकेच्या मालकीच्या श्री महालक्ष्मी फेरीवाला मार्केट, सि.स. नं. 2267, सरस्वती टॉकीज शेजारील वाहनतळ चालविण्यास देण्याची निविदा मागविण्यात येत असून, पाच वर्षांच्या मुदतीकरिता ठेकेदाराची नियुक्त याठीकाणी करण्यात येणार आहे. या वाहनतळातून महापालिकेला अंदाजे 1 कोटी 50 लाख रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे. याचबरोबर मध्यवर्ती एसटी स्टॅण्ड येथे वाहनतळ व्यवस्थेसाठीही ठेकेदार नियुक्त करण्यात येणार असून, त्यातून अंदाजे 25 लाख रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षीत धरण्यात आले आहे.

            तरी या निविदेमध्ये जास्तीजास्त ठेकेदारांनी भाग घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांनी घेतला आढावा

महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांनी घेतला आढावा क…