Home शासकीय “आपली जनगणना, आपला विकास”:जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

“आपली जनगणना, आपला विकास”:जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

11 second read
0
0
9

no images were found

आपली जनगणनाआपला विकास”:जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी): भारत सरकारच्या जनगणना विभागामार्फत जनगणना २०२७ चा पहिला टप्पा दिनांक १६ मे पासून सुरु करण्यात आलेला आहे. या टप्प्यात घरगणना व घरयादी गट तयार करण्यात येत असून यासाठी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकास नागरिकांनी योग्य व अचूक माहिती देऊन देशाच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

            जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया असून शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा व विविध शासकीय योजनांच्या नियोजनासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे जनगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णत सुरक्षित व गोपनीय ठेवली जाणार आहे. जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत माहितीची गोपनीयता सुनिश्चित करण्यात आली असून संकलित माहितीचा वापर केवळ सांख्यिकीय उ‌द्देशासाठी केला जाईल कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा पत्ता इतरांना दिला जाणार नाही तसेच कर, पोलीस किंवा इतर कोणत्याही तपासणीसाठी या माहितीचा उपयोग केला जाणार नाही. प्रशिक्षित प्रगणक घरा घरात भेट देऊन माहिती संकलित करतील नागरिकांनी न घाबरता त्यांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी तसेच सदरचे प्रगणक हे राष्ट्रीय कार्य करत आहेत त्यांना अपमानित न करता त्यांचा आदर करावा, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी व देशाच्या विकासात साथ द्यावी इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८५५ वर संपर्क साधावा असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड

 डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून नि…