Home Uncategorized एचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ

एचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ

9 second read
0
0
10

no images were found

 एचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ

कोल्हापूर,  : शासनाकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) परिवहन आयुक्त कार्यालयाने 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.

1 जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) नसलेल्या जुन्या व नवीन वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे (Flying Squad) कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, ज्यांनी 30 जून 2026 पर्यंत रीतसर ॲपाइंटमेंट घेतली आहे. त्यांना यातून सवलत मिळेल.

HSRP नसलेल्या वाहनांचे हस्तांतरण, कर्ज बोजा या कामांवरील निर्बधांसह आता पुननोंदणी, वाहनात बदल आणि परवाना नूतनीकरण (Permit Renewal) या सारखी महत्वाची कामेही थांबवण्यात येणार आहेत. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी dyccomp.tpt-mh@gov.in या ई-मेलवर संपर्क साधवा, असे आवाहन इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास; 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास;  देश…