Home Uncategorized लाड-पागे वारसांची प्रकरणे तात्काळ प्रस्तावित करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

लाड-पागे वारसांची प्रकरणे तात्काळ प्रस्तावित करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

30 second read
0
0
10

no images were found

लाडपागे वारसांची प्रकरणे तात्काळ प्रस्तावित करा : आयुक्त डॉराजेंद्र भारुड

कोल्हापूर,  : महानगरपालिकेतील पात्र लाड-पागे वारसांची प्रलंबित असलेली उर्वरीत ४२ प्रकरणे तात्काळ प्रस्तावित करून संबंधितांना नियुक्त्या देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन, रचना व कार्यपद्धती विभाग तसेच आस्थापना विभागाच्या कामकाजाचा आढावा आज सकाळी आयुक्त कार्यालयात घेण्यात आला.

            यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी विविध कारणांमुळे निलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चौकशी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सेवामुक्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी. सध्या निलंबित असलेल्या ५४ कर्मचाऱ्यांपैकी जे कर्मचारी पुढील सहा महिने ते दोन वर्षांच्या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांच्या प्रकरणांची तत्काळ सुनावणी करून चौकशी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. यासाठी आवश्यक असल्यास स्वतंत्र चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच लाड-पागे प्रकरणांसोबतच कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रकरणेही तातडीने प्रस्तावित करावीत. कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल ऑनलाईन करण्याबरोबरच सेवा पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याचे निर्देशही दिले. तसेच सर्व सेवा नोंदी ऑनलाईन पद्धतीने अद्ययावत ठेवण्यावर त्यांनी भर दिला. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा धनादेश देण्यात यावा अशा सूचनाही यावेळी दिल्या. तसेच कर्मचाऱ्यांना १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतर देण्यात येणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तात्काळ देण्यासाठी पुढील आठवड्यात संबंधितांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

            या बैठकीस सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, प्रॉव्हिडंट फंड अधीक्षक मकरंद जोशी, आस्थापना अधीक्षक प्राजक्ता चौगुले यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास; 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास;  देश…