Home Uncategorized गगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

गगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

5 second read
0
0
9

no images were found

  गगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर,  : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत २५ मे रोजी गगनबावडा तालुक्यातील प्रत्येक गावात स्थापन असलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन तहसिल कार्यालय, गगनबावडा येथे संपन्न झाले.

      तहसिलदार रुपाली सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के, माजी अध्यक्षा बाल कल्याण समिती वैशाली बुटाले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस.एन.दाते, संरक्षण अधिकारी नवीन गुरव आदी उपस्थित होते.

      यावेळी श्रीम. सूर्यवंशी यांनी, ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य या नात्याने असणारे आपली भूमिका व कर्तव्य या बाबत मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कांबळे यांनी बालकांची सुरक्षितता व संरक्षणाच्या दृष्टीने गावातील ग्राम बाल संरक्षण समिती रचना व कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले तर बाल कल्याण समिती माजी अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी समाजामध्ये मुलींच्या बाबतीत होत असलेल्या बालविवाह या समस्येच्या अनुषंगाने बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी अॅड.शिल्पा सुतार यांनीही बालकांच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ या कायद्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दाते यांनी तर श्री. गुरव यांनी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास; 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास;  देश…