no images were found
बजाज जनरल इन्श्युरन्सचा ‘एमएचसीपी एज प्लस’ हेल्थ प्लॅन लाँच
कोल्हापूर : बजाज जनरल इन्शुरन्स ने ‘माय हेल्थ केअर प्लॅन एज+’ (एमएचसीपी एज प्लस) हा नवा हेल्थ इंडेम्निटी प्लॅन सादर केला आहे. वाढत्या आरोग्यसेवा खर्चांचा भार कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक लवचिक व सानुकूलित कव्हरेज देण्यासाठी हा प्लॅन तयार करण्यात आला आहे.
या प्लॅनमध्ये ₹५ लाखांपासून ₹५ कोटींपर्यंत इन्श्युरन्स कव्हर, अनलिमिटेड रिइनस्टेटमेंट सुविधा, हॉस्पिटलायझेशन खर्च, आयसीयू, शस्त्रक्रिया, आयुष उपचार, डे केअर प्रक्रिया आणि आपत्कालीन ॲम्ब्युलन्स सेवांचे कव्हरेज देण्यात आले आहे. तसेच विविध रायडर्स आणि ॲड-ऑन्सद्वारे ग्राहकांना अतिरिक्त संरक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे.
याबाबत बोलताना डॉ. तपन सिंगले यांनी सांगितले की, ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन अधिक लवचिक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक हेल्थ इन्श्युरन्स उपाय देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला हा प्लॅन आजीवन रिन्यूवल, पाच वर्षांपर्यंतचा पॉलिसी कालावधी आणि ३ महिन्यांच्या वयापासून कव्हरेजची सुविधा देतो.