Home मनोरंजन ‘हस्तिनापुर के वीर’ मालिकेत विवाना सिंग साकारणार गंधारीची भूमिका 

‘हस्तिनापुर के वीर’ मालिकेत विवाना सिंग साकारणार गंधारीची भूमिका 

8 second read
0
0
12

no images were found

 ‘हस्तिनापुर के वीर’ मालिकेत विवाना सिंग साकारणार गंधारीची भूमिका 

    सोनी सब आपल्या प्रेक्षकांसाठी एक भव्य पौराणिक गाथा घेऊन येत आहे हस्तिनापुर के वीर, जी पांडव आणि कौरवांच्या अनकथित बालपणाचा शोध घेते. त्यांच्या नातेसंबंधांमध्ये, मूल्यांमध्ये आणि त्यांच्या नियतीला आकार देणाऱ्या घटनांमध्ये डोकावत ही मालिका महाभारताला नव्या दृष्टिकोनातून सादर करते. या कथेला अधिक बळकटी देण्यासाठी, लोकप्रिय अभिनेत्री विवाना सिंग या मालिकेत गंधारीची भूमिका साकारत आहेत हस्तिनापुरची राणी आणि अशी आई, जिने आपल्या प्रेमाने आणि निवडींनी मुलांच्या आयुष्यावर कायमस्वरूपी ठसा उमटवला.

      विविध भूमिका साकारण्यात पारंगत असलेल्या विवाना सिंग आपल्या अभिनयात नैसर्गिक खोली आणि सौंदर्य आणतात. हस्तिनापुर के वीर मध्ये त्या गंधारीला एक प्रेमळ आणि सहानुभूतीपूर्ण आई म्हणून साकारतात जी आपल्या मुलांच्या भावनांना समजून घेते, पण अनेकदा करुणा आणि शिस्त यांच्यात दुभंगलेली असते. तिचा प्रवास हा सततच्या अंतर्गत संघर्षाचा आहे मुलांचं रक्षण करण्याची इच्छा आणि राणी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्याची गरज यांच्यातील संघर्ष. त्यामुळे ती कथेत एक भावनिक आणि प्रभावी उपस्थिती ठरते.

      आपल्या भूमिकेबद्दल बोलताना विवाना सिंग म्हणाल्या, “गंधारीची भूमिका साकारताना मला खूप उत्सुकता वाटते, कारण ती फक्त वरवर दिसते तशी नाही. तिच्या शांततेकडे जितकं मी आकर्षित होते तितकंच तिच्या सामर्थ्याकडेही. काही क्षण असे असतात जेव्हा ती सगळं समजते, पण प्रतिक्रिया न देता संयम निवडते. या भूमिकेसाठी तयारी करताना मी तिच्या अंतर्गत संघर्षांचा शोध घेत आहे तिची करुणा कधी कधी शिस्तीपेक्षा जास्त ठरते आणि त्यामुळे तिचं मुलांशी नातं आकार घेतं. मला खूप आनंद आहे की हे सगळे स्तर प्रेक्षकांसमोर आणता येतील आणि गंधारीला एकाच वेळी प्रभावी आणि मानवी रूपात सादर करता येईल.”

     ‘हस्तिनापुर के वीर’ मालिकेत प्रेक्षकांना महाभारताचा एक ताजा आणि भावनिक दृष्टिकोन पाहायला मिळेल, जिथे कथा युद्धांपलीकडे जाऊन त्या नातेसंबंधांवर, मूल्यांवर आणि निवडींवर प्रकाश टाकते, ज्यांनी या दंतकथांना घडवलं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

आनंदी मालिकेत धमाकेदार वळण सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा यांची एण्ट्री

आनंदी मालिकेत धमाकेदार वळण सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा यांची एण्ट्री स्टार प्रवाहच्या …