Home Uncategorized शहरातील नाले सफाई मधून 90 डंपर गाळ उठाव

शहरातील नाले सफाई मधून 90 डंपर गाळ उठाव

38 second read
0
0
29

no images were found

शहरातील नाले सफाई मधून 90 डंपर गाळ उठाव

कोल्हापूर  : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 90 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या 4 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील महालक्ष्मी हॅाल मंगळवार पेठ, मनोरा हॅाटेल राजेंद्र नगर, सुखसागर हॅाटेल लक्ष्मीपुरी व जयंती पंपिंग स्टेशन (लॅाग पोकलेन) येथे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरू आहे.

            महापालिकेच्यावतीने शहर मधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 292 लहान नाले व 109 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसले मळा, साळोखेमळा, समाज कल्याण ऑफिस अशा 292 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे.

            तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…