Home राजकीय कोल्हापूर महापालिकेच्या दुर्लक्षित मिळकतींना विकासासाठी भाजपचा पुढाकार

कोल्हापूर महापालिकेच्या दुर्लक्षित मिळकतींना विकासासाठी भाजपचा पुढाकार

2 second read
0
0
21

no images were found

कोल्हापूर महापालिकेच्या दुर्लक्षित मिळकतींना विकासासाठी भाजपचा पुढाकार

कोल्हापूर  : कोल्हापूर शहरात अनेक महापालिकांच्या मोकळ्या जागा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या असून, त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घरफाळा आणि पाणीपट्टी वाढवण्याऐवजी, उपलब्ध मिळकतींचा योग्य वापर करणे हा अधिक प्रभावी मार्ग आहे, यावर भाजपने भर दिला आहे. याच विषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय महादेव जाधव यांनी  कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त विजय पाटील व उप-शहर अभियंता निवास पवार यांना सोबत घेऊन नागाळा पार्क येथील एव्हरग्रीन होम सोसायटीमधील भूखंड क्रमांक १८२ (आरक्षण क्रमांक ३६६) या महत्त्वाच्या महापालिका मिळकतीची पाहणी केली व सदर मिळकतीचा ताबा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

हा तब्बल ४००० चौरस फुटांचा व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचा भूखंड २०११ पासून महापालिकेच्या ताब्यात घेतलेला नसल्याने दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. सध्या या जागेवर मोकाट कुत्र्यांचा वावर असून, महापालिकेच्या नावावर आरक्षित असलेले स्वतंत्र पार्किंगही वापराविना आहे. २०१३ ते २०२६ या १३ वर्षांच्या काळात जर या जागेचा योग्य भाडेतत्त्वावर वापर केला असता, तर महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. या दुर्लक्षामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

या संदर्भात, विजय महादेव जाधव यांनी आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांना निवेदन दिले आहे. या निवेदनातून त्यांनी एव्हरग्रीन होम येथील भूखंडावर तात्काळ महापालिकेचा फलक लावावा, जागेचा ताबा घ्यावा आणि त्यावर महापालिकेचा एखादा लोकोपयोगी प्रकल्प राबवावा किंवा व्यावसायिक दृष्ट्या भाडे करारावर देऊन उत्पन्न वाढवावे, अशी मागणी केली आहे. अशा प्रयत्नांमुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन, या मौल्यवान मिळकतीचे योग्य जतन होईल, अशी अपेक्षा आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या; अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन छेडणार! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या; अन्…