Home विमा मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये शिस्तबद्ध सहभागासाठी‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर

मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये शिस्तबद्ध सहभागासाठी‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर

47 second read
0
0
9

no images were found

मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये शिस्तबद्ध सहभागासाठी‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर

·         मजबूत आर्थिक पाया आणि आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांवर गुंतवणुकीचा भर

·         नियमाधारित निर्देशांक धोरणामुळे शिस्तबद्ध आणि पारदर्शक गुंतवणुकीची संधी

·         लार्ज आणि मिड-कॅप कंपन्यांमध्ये विविधीकरणासह गुंतवणुकीची संधी

   मुंबई,  : ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स’ने आपल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युलिप्स) अंतर्गत ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर केला आहे. मोठ्या आणि मध्यम आकाराच्या व आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देत, दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती करण्याच्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आला आहे.

       याबाबत बोलताना ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी मनीष कुमार म्हणाले, “आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंडा’मुळे ग्राहकांना इक्विटी बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एक संरचित आणि पारदर्शक पर्याय मिळतो. मूलभूतपणे चांगली आर्थिक स्थिती असलेल्या आणि आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांवर या फंडाचा भर आहे. या फंडाची गुंतवणूक धोरणे काही महत्त्वाच्या आधारस्तंभांवर आधारित आहेत. विविध आर्थिक निकषांच्या आधारे मूल्याधारित शेअर्सची निवड, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि बाजार भांडवलाच्या विविध गटांमध्ये गुंतवणूक करून त्यामध्ये विविधीकरण, तसेच ठराविक नियमांवर आधारित शिस्तबद्ध गुंतवणूक प्रक्रिया असे हे आधारस्तंभ आहेत. यासोबतच ठराविक कालावधीनंतर फंडाचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल आणि संतुलनही राखले जाणार आहे.”

       “महत्त्वाचे म्हणजे, या पद्धतीमुळे बाजारातील चढ-उतारांच्या काळातही ग्राहक दीर्घकालीन धोरण बाळगून आत्मविश्वासाने ही गुंतवणूक कायम ठेवू शकतात. तुलनेने कमी लक्ष वेधून घेणाऱ्या गुंतवणुकीच्या संधींचाही फायदा त्यांना मिळू शकतो,” असेही मनीष कुमार म्हणाले.

        दि. ३० मार्च २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ‘आयसीआयसीआय प्रु बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स’ने मागील तीन वर्षांत वार्षिक सरासरी ३२ टक्के, पाच वर्षांत २८.९ टक्के आणि दहा वर्षांत १९.४ टक्के परतावा दिला आहे. बाजारातील विविध चढ-उतारांच्या काळातही शिस्तबद्ध आणि मूल्याधारित गुंतवणूक करण्याच्या पद्धतीची ताकद या कामगिरीतून दिसून येते. हा फंड निष्क्रिय (पॅसिव्ह) आणि निर्देशांकावर आधारित गुंतवणुकीच्या धोरणावर आधारीत आहे. मूळ निर्देशांकाच्या कामगिरीचा मागोवा घेत, मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये सातत्याने सहभाग मिळवून देणे हा त्याचा उद्देश आहे.

       ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ या फंडाची रचना ‘आयसीआयसीआय प्रु बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स’नुसार करण्यात आली आहे. या निर्देशांकात ‘बीएसई’च्या लार्ज आणि मिड-कॅप गटातील ३० कंपन्यांची निवड केली जाते. ही निवड ‘बुक व्हॅल्यू-टू-प्राइस’, ‘अर्निंग्स-टू-प्राइस’ आणि ‘सेल्स-टू-प्राइस’ अशा मूल्यांकन निकषांच्या आधारे केली जाते. हा खास रचना असलेला फंड ‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स’शी सुसंगत असून, तो ‘इर्डा’च्या नियामक अटींनुसार तयार करण्यात आला आहे. बीएसई लार्ज-मिडकॅप गटातील मूलभूत आर्थिक निकषांवर आकर्षक मूल्यांकन असलेल्या ३० कंपन्यांच्या मूल्याधारित प्रवासाचे चित्र समोर आणणे हा या निर्देशांकाचा उद्देश आहे. नियामक मार्गदर्शक तत्त्वांमुळे एखादा शेअर निवडता आला नाही, तर त्याऐवजी पात्र असलेला पुढील शेअर यामध्ये निवडला जातो; जेणेकरून ३० शेअर्सचा गट कायम राहील. मजबूत आर्थिक पाया आणि बाजारमूल्य यांच्या बरोबरीने आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्या ओळखण्यासाठी या निर्देशांकात पारदर्शक व नियमाधारित पद्धतीचा वापर करण्यात येतो.

       दर सहा महिन्यांनी या निर्देशांकाचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल आणि संतुलन केले जाते. त्यामुळे विविध क्षेत्रांमधील बदलत्या गुंतवणूक संधींनुसार फंडाचा पोर्टफोलिओ अद्ययावत राहतो. तसेच विविधीकरण आणि पोर्टफोलिओचे संतुलन राखण्यासाठी शेअर्स आणि क्षेत्रांवरील गुंतवणुकीच्या मर्यादांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

      ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ हा ‘आयसीआयसीआय प्रु सिग्नेचर अश्युअर’, ‘स्मार्टकिड अश्युअर विथ आयसीआयसीआय प्रु सिग्नेचर अश्युअर’, ‘आयसीआयसीआय प्रु स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस (एसआयपी+)’ अशा इतर युलिप योजनांद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनांमध्ये आयुर्विम्याची सुविधाही असेल. अधिक माहिती www.iciciprulife.com येथे उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन इक्विटी गुंतवणुकीसोबतच आयुर्विम्याच्या संरक्षणाचाही लाभ एकत्रितपणे मिळू शकणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी डी. वाय. पाटील कॉ…