Home Uncategorized केंद्र सरकारकडून मंजूर असलेल्या निधीतील उर्वरीत सुमारे ५० कोटी रुपये शिवाजी विद्यापीठाला तातडीने मिळावेत, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

केंद्र सरकारकडून मंजूर असलेल्या निधीतील उर्वरीत सुमारे ५० कोटी रुपये शिवाजी विद्यापीठाला तातडीने मिळावेत, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

0 second read
0
0
35

no images were found

केंद्र सरकारकडून मंजूर असलेल्या निधीतील उर्वरीत सुमारे ५० कोटी रुपये शिवाजी विद्यापीठाला तातडीने मिळावेत, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नुकतीच भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विविध योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र त्यापैकी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी, प्रत्यक्ष विद्यापीठाकडे वर्ग झालेला नाही. विद्यापीठातील नाविन्यपूर्ण योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीपैकी सुमारे ५७ लाख १४ हजार रुपयांचा निधी येणे बाकी आहे. वैयक्तिक संशोधन प्रकल्पांसाठी सुमारे १३ लाख १२ हजार रुपयांचा निधी येणे गरजेचे आहे. विद्यापीठातील हिंदी विभागाच्या विविध कामांसाठी २५ लाख ३२ हजार रुपये येणे आवश्यक आहे. तर विद्यापीठातील विविध विभागांच्या अध्यासनांसाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी येणे आवश्यक आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठाच्या अकराव्या योजनेतील सुमारे ६ कोटी ४२ लाख रुपये येणे बाकी आहे. तर बाराव्या योजनेअंतर्गत विद्यापीठाला ९ कोटी ५७ लाख रुपये येणे गरजेचे आहे. याशिवाय अन्य काही योजनांसाठी मंजूर झालेल्या निधीतील काही रक्कम विद्यापीठाकडे आली असली, तरी बरिचशी रक्कम येणे बाकी आहे. याबाबत शिवाजी विद्यापीठाने विनंती केल्यानुसार, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. शिवाजी विद्यापीठाला मंजूर झालेल्या निधीतील थकीत सुमारे ५० कोटी रुपये तातडीने मिळावेत, या मागणीचे निवेदन, नामदार धर्मेंद्र प्रधान यांना देण्यात आले. खासदार महाडिक यांच्या मागणीबद्दल, केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…